डॉ .पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

दर्पण न्यूज पलूस :-
प्राणिशात्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित व आय .सी. एस .एस. आर . प्रायोजित दोन दिवसीय राष्ट्र्रीय चर्चासत्राचे २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थचे डॉ .पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे या विषयावर आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रामध्ये हवामान तज्ज्ञ आणि कृषी अभ्यासकांनी आपली मते मांडली.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या प्रास्ताविकामधे चर्चासत्राचे समन्वयक डॉ. नंदकुमर कांबळे यांनी हवामान बदलामुळे
अवेळी पडणारा मौसमी पाऊस,कमी वेळेत होणारी अतिवृष्टी, ढगफुटी व बदलता मौसमी पाऊस या सर्व घटकांचा ग्रामीण अर्थव्यवस्तेवर होणार परिणाम यावर धोरणकर्ते ,कृषी अभ्यासक,संशोधक व शेतकरी यांनी एकत्र येऊन ठोस उपाय सुचवण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित केल्याचे सांगितले.
या दोन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य जे .के . जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये अवेळी येणार पाऊस यामुळे एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पूर अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे त्याचबरोबर जागतिक तापमान वाडी मूळे मान्सून अनिश्चित झाला आहे असे ते आपल्या उदघाटनपर मनोगतामध्ये मत व्यक्त केले. या दोन दिवसीय चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थाचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी दीर्घकाळ रेंगाळणारा पाऊस व कमी वेळात जास्त पाऊस (अतिवृष्टी) पडण्याच्या घटना वाढल्या आहेत याचा थेट फटका शेतकरी व देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला बसत आहे असे मत व्यक्त केले. या चर्चासत्राचे प्रमुख बीजभाषक राजर्षी छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय, कॊल्हापूर येथील डॉ . अभयकुमार बागडे यांनी अवेळी पडणारा पाऊस, कमी वेळात होणार जास्त पाऊस व ढगफुटी यामुळे शेतकऱ्यांनी शेती करण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे तसेच परंपरागत शेतीपेक्षा हवामान अंदाज लक्षात घेऊन पीक नियोजन करणे गरजेचे आहे अशे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . उज्वला पाटील यांनी मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करताना हवामान बदलाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन केल्यास नुकसान टाळता येणे शक्य आहे असे मत व्यक्त केले.
चर्चासत्राच्या पहिल्या सत्राचे साधनव्यक्ती डॉ . अभयकुमार बागडे यांनी बदलत्या वातावरणात उष्ण व पाऊस या वातावरणात तग धरतील अशा पिकांच्या जाती विकसित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अनियमित आणि तीव्र पावसामुळे शेतमाल, पिकांच्या वाढीचा कालावधी, जमीन आणि पाणी व्यवस्थापन यावर गंभीर परिणाम होत आहेत असे मत व्यक्त केले .
दुसऱ्या सत्राचे साधनव्यक्ती भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव येथील डॉ. धर्यशील लाड यांनी बदलत्या मान्सून च्या चक्रामुळे काडी ऊन कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांवर रोग व किडींचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी
पीक पेरणीच्या वेळेत बदल करणे, बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या व अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाचा
वापर करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
तिसऱ्या व समारोपाच्या सत्रामध्ये भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव येथील प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव यांनी चर्चासत्राचा समारोप करताना, हवामान बदलांना तोंड देण्यासाठी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यामध्ये ठिबक सिंचन, पाण्याचा पुनर्वापर, आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड ,शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेती पूरक उद्योग जसे रेशीम उदयॊग ,पशुसंवर्धन, दुग्ध उत्पादन, फळबाग,याचे महत्व अधोरेखित केले व हवामानाचा अचूक अंदाज घेऊन शेतीचे नियोजन केल्यास नुकसान टाळता येणे शक्य आहे असे प्रतिपादन केले.या चर्चासत्रामध्ये सहभागी प्राध्यापक ,विदयार्थी यांनी शोधनिबंधाचे मौखिक वाचन व पोस्टर चे सादरीकरण केले.
या चर्चासत्रामध्ये अनेक कृषी अभ्यासक, शास्त्रज्ञ, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक ,शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक चर्चासत्राचे समन्वयक डॉ. नंदकुमर कांबळे यांनी केले ,प्रा.दिनेश ससाणे समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सह- समन्वयक डॉ. आशिया मोमीन , उपप्राचार्य डॉ . गौरी पाटील, डॉ. मनीषा म्हस्के,प्रा.दीपाली पाटील,प्रा.सायली घाडगे, यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नम्रता कांबळे व प्रा. शुभांगी लवटे यांनी केले.



