रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात
शिव गीतांजली, मेघा पथयात्रा चे संयोजन


दर्पण न्यूज पलूस :
रामानंद नगर येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली)मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त कवी काकासाहेब देशमुख यांनी शिव गीतांजली चा कार्यक्रम सादर केला त्यांनी शिव गीतांजली मधून शिवरायांचे पराक्रमाचे किस्से आपल्या कवितेतून सांगितले यास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
कवी काकासाहेब देशमुख यांचे आजवर 1700 च्या वर कार्यक्रम झालेले असून त्यांचा शिवचरित्र चा चांगला अभ्यास असून शिवरायांचे विचार लोकांपर्यंत आपल्या कवितेतून सादर करतात असे प्राचार्य डॉ.यू. व्ही. पाटील यांनी सांगितले.
महाविद्यालयात शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर शिव गीतांजली चा कार्यक्रम संपन्न झाला. रामानंदनगर परिसरामध्ये मेघा पथयात्रेचे संयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राचार्य यू.व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य डॉ.गौरी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. धनेश गवारी, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख लेफ्टनंट संदेश दौंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



