महाराष्ट्र

नटराज’ व ‘विश्वकर्मा’ पुरस्कारासाठी प्रस्ताव 3 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन  

दर्पण न्यूज सांगली : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पारंपारिक लोककलाकारांना नटराज पुरस्कार व पारंपारिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी 4 प्रतीत प्रस्ताव 3 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सांगली सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे

पारंपारिक लोककलाकारांना व पारंपारिक कारागिरांना विभाग स्तरावर 7 पुरस्कार आणि राज्य स्तरावर 2 पुरस्कार देण्यात येतील (उक्त राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये महिलांसाठी 1 व पुरूषांसाठी 1 राखीव पुरस्कार असतील). प्रस्ताव 3 मार्च 2026 पर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सांगली कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली यांच्याकडे सादर करावेत. पुरस्काराचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अनुषंगिक अधिकच्या माहितीसाठी कार्यालयत संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!