महाराष्ट्रराजकीय

आयुर्विमा महामंडळ दिल्लीचा ग्रँडमास्टर श्रीराम झा, ला अजिंक्यपद,,, साताराचा अनिकेत बापट उपविजेता तर पुण्याचा निखिल दीक्षित तृतीय

भाऊसाहेब देशपांडे स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा

 

 

दर्पण न्यूज कोल्हापूर  अनिल पाटील :-
जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने विझार्ड चेस क्लब ने आयोजित केलेल्या तृतीय भाऊसाहेब देशपांडे स्मृती व पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाल्या.इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन राजारामपुरी येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर अग्रमानांकित आयुर्विमा महामंडळ दिल्लीचा ग्रँडमास्टर श्रीराम झा आठ गुण व पंचावन्न टायब्रेक गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले ‌श्रीराम ला रोख 21000 रुपये व भव्य चषक देऊन गौरवण्यात आले तर अकरावा मानांकित साताऱ्याचा अनिकेत बापट ने आठ गुण व साडेचोपन्न टायब्रेक गुण मिळवून उपविजेत्या पदावर मुसंडी मारली.अनिकेतचा रोख 15000 रुपये व चषक देऊन गौरव केला. द्वितीय मानांकित पुण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षितने आठ गुण व साडेबावन्न टायब्रेक गुण मिळवत तृतीय स्थान निश्चित केले.निखिल ला रोख दहा हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.तृतीय मानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे ने आठ गुण व एकावन्न टायब्रेक गुणांसह चतुर्थ स्थान संपादन केले. त्याचा रोख 8000 रुपये व चषक देऊन सन्मान केला.पाचवा मानांकित पुण्याचा श्लोक शरणार्थी चा साडेसात गुणासह पाचवा क्रमांक आला. श्लोकचे रोख सहा हजार रुपये व चषक देऊन कौतुक करण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवनाचे प्रमुख सौ.श्रद्धा बडे , निपाणीचे उद्योगपती व बुद्धिबळ संघटक प्रविण शहा , विझार्ड चेस क्बबच्या सौ. प्रतिमा गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्रीपाद वैद्य, सौ.कुंदा वैद्य, युवा उद्योजक अमोल देशपांडे, धीरज वैद्य, सुरज वैद्य, अमृता देशपांडे, अश्विनी वैद्य, अमृता वैद्य, प्रसाद कुलकर्णी, सौ अस्मिता कुलकर्णी, सौ.दीपा कुलकर्णी,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले , पौर्णिमा उपळाविकर-माने ,फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, आरती मोदी,आदित्य आळतेकर व करण परीट यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माने यांनी केले.*या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या सहा पटावर इलेक्ट्रॉनिक्स बुद्धिबळ पटाचा वापर करण्यात आला होता त्याचे थेट आनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर संजय इलेक्ट्रॉनिक्स च्या वतीने पालक व प्रेक्षकांना एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. सर्व खेळाडू व पालकांना चहा व दुपारच्या जेवणाची सोय मोफत करण्यात आली.* *इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे* *मुख्य बक्षिसे* क्र.6) ओम लमकाने पुणे 7) ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर 8) प्रथमेश शेर्ला पुणे 9) प्रणव पाटील कोल्हापूर 10) सोहम खासबारदार कोल्हापूर 11) श्रीराज भोसले रेंदाळ 12) सोहम दातार पुणे 13) आदित्य सावळकर कोल्हापूर 14) मुदस्सर पटेल मिरज 15) अभिषेक पाटील मिरज 16)अपूर्व देशमुख सातारा 17) रोहन ढोरे पुणे 18) उमेश कुलकर्णी मुंबई 19) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 20) रोहन पाथरकर पुणे 21) सम्मेद पाटील इचलकरंजी 22) सदानंद चोथे सांगली 23) आर्या दिवम मध्य प्रदेश 24) श्रीकांत मुचंडीकर पुणे 25) संतोष सरीकर इस्लामपूर 26) आदित्य आळतेकर कोल्हापूर 27) हित बलदवा जयसिंगपूर 28) संतोष कांबळे कोल्हापूर 29) अंशुमन शेवडे बेळगाव 30) शंकर साळुंखे बार्शी *साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू* 1) बीएस नाईक कोल्हापूर 2) माधव देवस्थळी कोल्हापूर 3) रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर 4) दिलीप कुलकर्णी सांगली 5) भारत पाटोळे निपाणी *उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू* 1)संस्कृती सुतार नांदणी 2) माधवी देशपांडे सांगली 3)आरोही बनसोडे कोल्हापूर 4)नंदिनी सारडा इचलकरंजी 5) सृष्टी जोशीराव कोल्हापूर 6) स्नेहल गावडे कोल्हापूर 7) वेदिका मदने कोल्हापूर 8) निधी पोटे चंदगड 9) हर्षदा सूर्यवंशी पाटील कोल्हापूर 10) श्रीनिधी भोसले सांगली। *उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू* 1)यश गोगटे रत्नागिरी 2) नवीन मेरवाडे बेळगाव 3) राजाराम पताडे मालवण *दोन हजार गुणांकना खालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)विवान सोनी इचलकरंजी 2)साहस नारकर रत्नागिरी 3)आदित्य खैरमोडे सांगली 4)उल्हास त्रिरत्ने मुंबई 5)प्रवीण सावर्डेकर चिपळूण 6)रुपेश भोगल ठाणे 7)अक्षय खेर रत्नागिरी 8)प्रमोद पवार कोल्हापूर 9) जय करोशि कोल्हापूर 10)अनिश कलावडे कोल्हापूर *सोळाशे गुणांकना खालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)अथर्व चौगुले सांगली 2)कश्यप खाकरीया सांगली 3)ओंकार सावर्डेकर चिपळूण 4) रुद्र माने इचलकरंजी 5)सोहम रूमडे रत्नागिरी 6)आदित्य टिळक सांगली 7)रवि आंबेकर कोल्हापूर 8)अभय पल्सपकर कोल्हापूर 9) प्रसन्न जगदाळे सोलापूर 10) संदीप माने सांगली। *बिगर गुणांकनप्राप्त उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1) अनिरुद्ध रुईकर कोल्हापूर 2) आर्यन पोळ कोल्हापूर 3) शिवेंद्र सिंग शिंदे सांगली 4) रोहन देशमुख सातारा 5) मुगेंद्र पवार सातारा 6) अर्णव र्हाटवळ कोल्हापूर 7) ओम चव्हाण रत्नागिरी 8) ओंकार पाटील सांगली 9) श्रवण ठोंबरे कोल्हापूर 10) गणेश गाढवे सातारा। *सोळा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1) अर्णव शेडगे सांगली 2)स्वरूप साळवे गडहिंग्लज 3 )अथर्व तावरे इचलकरंजी 4) राजदीप पाटील कोल्हापूर 5)तेजस वेर्णेकर बेळगाव 6) तनिश तेंडूलकर सावंतवाडी 7)अथर्व कुंभार इचलकरंजी 8) सिद्धांत पाटील सांगली 9) संस्कार काटकर कोल्हापूर 10) सौमित्र केळकर सांगली *चौदा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1) अभय भोसले जांभळी 2)सर्वेश पोतदार कोल्हापूर 3)सोहम देशमुख सिंधुदुर्ग 4)आशीष मोठे सांगली 5)श्रेयश पाटील कोल्हापूर 6)आदिराज म्हेत्रे सोलापूर 7)स्पर्श लव्हाळे सांगली 8)सार्थक जाधव सातारा 9)कनक बागडे भंडारा 10) अलीक गांगुली रत्नागिरी *बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1) तिर्थ कोद्रे पुणे 2)वरद पाटील सांगली 3)शौर्य बगडीया इचलकरंजी 4) आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी 5) वेदांत बांगड इचलकरंजी 6)आदित्य ठाकूर अतिग्रे 7)देवदत्त पटवर्धन सोलापूर 8)पृथ्वीराज पाटील सांगली 9)अन्वय भिवरे कोल्हापूर 10) अरजित पाटील कोल्हापूर *दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1) अद्वैत जोशी बेळगाव 2) अवनिश जितकर कोल्हापूर 3)शनया मलाणी इचलकरंजी साईंश4) देसूरकर बेळगाव 5) सांची बजाज इचलकरंजी 6) अनिरुद्ध साळुंखे सांगली 7)श्रीतेज वाली कोल्हापूर 8)नारायणी घोरपडे कोल्हापूर 9) संस्कार वनीरे कोल्हापूर 10) शिवांश सुतार कोल्हापूर *आठ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 2)ह्रीयांश कोतवाल सांगली 3)रिधान करवा इचलकरंजी 4)आरव पाटील सांगली 5)जयराज काजवे वारणानगर 6)सौमित्र जोशी कोल्हापूर 7)यजवरी शेटे गोवा 8)जोहान शेख कोल्हापूर 9) हर्ष कांबळे कोल्हापूर 10) शिवराज कमते कोल्हापूर *कोल्हापुरातील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 1)मानस महाडेश्वर कोल्हापूर 2)अभिजीत चव्हाण वारणानगर 3)प्रेम निचल सेनापती कापशी 4)हेमंत भोसले कोल्हापूर 5)अर्णव पोर्लेकर कोल्हापूर 6)मन्वित कांबळे कोल्हापूर 7) विवेक चित्रकार कोल्हापूर 8)आदित्य कोळी इचलकरंजी 9) अमेय कुलकर्णी कोल्हापूर 10) दर्शन कर्डेपाटील कोल्हापूर *उत्कृष्ट अकॅडमी/क्लब* 1)विझार्ड चेस क्लब 2) के पी चेस अकॅडमी 3) अनया चेस क्लब

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!