मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला “रुबाब” रूबाबदारचं चित्रपट

आरपार नंतर मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला रुबाब हा एक cult सिनेमा आहे. आरपार एक शहरी वातावरणातली कथा होती. रुबाब ग्रामीण म्हणता येणार नाही पण छोट्या शहरातली प्रेमकथा आहे. मुंबई पुण्यात न दिसणारं जीवन यात आहे. व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवावेत तशा मोटारसायकलच्या पाट्या ठेवल्या जातात. गावकी भावकी दिसते. मनसोक्त आणि निवांत उनाडपणा करणारी मुलं दिसतात.
पॉश आणि चकचकीत लुक सोडून रखरखीत आणि रांगड्या कॅनव्हास वर ही प्रेमकथा उलगडते. यातला प्रत्येक प्रसंग रसभरीत आहे. अस्सल आहे. उगाचच सैराटची कॉपी नाही. लेखक दिग्दर्शकाने एका ठाम विचाराने सादर केलेला सिनेमा आहे रुबाब. तांत्रिक दृष्ट्या सरस. संकलन आणि छायाचित्रण टॉप क्लास. विशेषतः कॅमेऱ्याचे ट्रॅकिंग शॉट्स. मोटरसायकल हा या चित्रपटातला एक महत्वाचा पण सायलेंट एलिमेंट आहे. या मोटरसायकल्सना समांतर धावत टिपणारा कॅमेरा खूप काही सांगून जातो.
यातले कलाकार म्हणजे तिथलेच स्थानिक वाटावेत इतके अस्सल. नायक संभाजी सासणे एकाचवेळी निरागस आणि हिंसक वाटतो. प्रेमात पडल्यानंतरचा विद्ध तरुण अंगावर येतो. संभाजी बराचसा आपल्या देव पटेल सारखा दिसतो. नायिका शीतल पाटील तोडीस तोड आहे. सुंदर दिसली आहे आणि अभिनय उच्च दर्जा. तिचा नाच म्हणजे एनर्जी पील आहे. चित्रपटाचा शेवटचा प्रसंग या दोघांनी जमके बॅटिंग केलीय.
चिनार महेश यांचं संगीत सुपरहिट आहे. विशेषतः पॉम पॉम हे गाणं धमाल आहे. ते फारसं गाजलं का नाही कळत नाही. रुबाब सुद्धा त्या मानाने कमी चर्चेत आहे असं वाटतं. रुबाब चे दक्षिण भारतीय भाषांमध्ये रिमेक व्हावेत इतका तो उत्तम जमलेला सिनेमा आहे. वेळ काढून, वाट वाकडी करून बघावा असा. खासकरून मराठी सिनेमाला नावं ठेवणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी. शो सम लव.
Gurudutt Vasant Sonsurkar
झी स्टुडिओज् आणि झणकर फिल्म्स
Written & Directed By – Shekhar Bapu Rankhambe
Cinematography – Amol Salunkhe
Editing – Sourabh Prabhudesai
Produced by – Zankar Films
Producers – Sanjay Zankar & Gouri Zankar
Presented By –
• Umeshkumar Bansal (Zee Studios)
• Bavesh Janavlekar (Zee Studios)
Main Cast :
Sambhaji Sasane
Sheetal Patil
Vishal Shirtode
Abhijeet Sakate
Simran Khedkar
Art Direction – Sanjay Pawar
Music – Chinar Kharkar, Mahesh Ogale
Lyricist : Mangesh Kangane, Vinayak Pawar, Sameer Asha Patil
Costume Design – Kajal Jadhav, Apurva Shouche
Background Score – Chinar Kharkar, Mahesh Ogale
VFX By: Just Imagine Studio
VFX Supervisor: Harshal Bhujbal, Akash Argade, Aakaash Chavhan
Sound Design – Mandar Kamplapurkar
Sound : Umar Mulani
Choreography – Rahul Thombre
Chief Assistant Director: Vikram Maruti Shirtode
Executive Producer – Prasad Kale
Line producer: Vijay Popat Devkar
Assistant Executive Producer: Radhika Zankar
Makeup : #MangeshGaikwad
Post Production : Cinetatva Studio
DI Lab – Ganraj Associates Studios
Marketing Consultant – Purnasya Media and Entertainment
Publicity & PR – Amruta Chhaya Mane (Avadumber Entertainments)
Digital Promotion – Vaibhav Shetkar
Publicity Design – Loki Studio
Music Label – Zee Music Marathi
Zee Studios Team
Revenue & Distribution Head – Girish Johar
Distribution – Sadik Chitalikar
Legal – Sucheta Burman, Kinat Sisodiya
Finance Head – Nilesh Deorah
नक्की पहा “रुबाब “ आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.



