ढढढढढढढ

सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे भूतपूर्व अध्यक्ष आणि आधारस्तंभ स्वर्गीय द.भा.तथा काकासाहेब चितळे यांचा सहावा स्मृतिदिन वाचनालयाचे वतीने भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला यानिमित्त श्रीमती सुनिता चितळे वहिनी यांचे हस्ते स्वर्गीय काकासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष गिरीश चितळे मकरंद चितळे लीना चितळे वाचनालयाचे सर्व पदाधिकारी सभासद वाचक जायंट्स पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले याप्रसंगी उपाध्यक्ष डी .आर.कदम सतीश पाटील,गिरीश चितळे यांनी मनोगत व्यक्त करून काका साहेबांना श्रद्धांजली वाहिली यानिमित्ताने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सतीश बापट यांचे सद्यस्थिती आणि समाजसेवेची दिशा या विषयावर प्रबोधन पर व्याख्यानही वाचनालयाच्या हॉलमध्ये संपन्न झाले.पुस्तक भेट संकल्प वर्षाच्या प्रबोधन फलकाचे अनावरण ही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आभार विद्या निकम यांनी मांडले सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले.



