महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 ; जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान     

सांगली जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी ; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

   दर्पण न्यूज मिरज /   सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितीच्या 122 निर्वाचन गणांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सरासरी 69.76 टक्के इतके मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर  122 फेऱ्यांमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

मतमोजणीसाठी तालुकानिहाय टेबल संख्या व फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. आटपाडी – 18 टेबल, 12 फेऱ्या, जत – 27 टेबल, 13 फेऱ्या, खानापूर – 16 टेबल, 9 फेऱ्या, कडेगाव – 16 टेबल, 11 फेऱ्या, तासगाव – 20 टेबल, 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ – 16 टेबल, 9 फेऱ्या, पलूस – 14 टेबल, 9 फेऱ्या, वाळवा – 22 टेबल, 19 फेऱ्या, शिराळा – 20 टेबल, 9 फेऱ्या, मिरज – 22 टेबल, 19 फेऱ्या.

तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – आटपाडी – पहिला मजला हॉल नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव, दत्तमाळ. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, दिवाणी न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.

तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे –

अ.क्र. तालुका निवडणूक

विभाग

निर्वाचन

गण

एकूण मतदार झालेले मतदान
पुरूष स्त्री इतर एकूण पुरूष स्त्री इतर एकूण टक्के-वारी
1 आटपाडी 61738 59372 4 121114 45894 43013 4 88911 73.41
जत १८ 140188 127300 1 267489 95231 85035 0 180266 67.39
खानापूर 57449 57002 3 114454 38626 38388 3 77017 67.29
कडेगाव 67141 68443 3 135587 49645 47364 2 97011 71.55
तासगाव १२ 96621 92988 5 189614 65638 60205 2 125845 66.37
कवठेमहां-काळ 63423 61748 0 125171 43136 39395 0 82531 65.93
पलूस 62493 62148 2 124643 48403 46009 1 94413 75.75
वाळवा ११ २२ 151788 147048 3 298839 115560 107685 3 223248 74.71
शिराळा

 

70654 68483 2 139139 49564 48105 2 97671 70.20
१० मिरज ११ २२ 152426 150249 19 302694 105045 96874 9 201928 66.71
एकूण ६१ १२२ 923921 894781 42 1818744 656742 612073 26 1268841 69.76

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!