महाराष्ट्रराजकीयसामाजिक

अंकलखोप जि प गटातील काँग्रेसचे उमेदवार सुदीप गडदे, युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रणाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस :-
सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे, पलुस कडेगांव विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रणाली पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी पलुस कडेगांव विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रणाली पाटील यांनी सांगितले की ,आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनी यांनी मतदान करण्याची गरज आहे. तसेच अंकलखोप जिल्हा परिषद गट आणि अंकलखोप पंचायत समिती गण, आमणापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपण मतदान केल्याबद्दल लोकांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!