महाराष्ट्रराजकीयसामाजिक

ममममम

दर्पण न्यूज भिलवडी पलूस एकजिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या भिलवडी, माळवाडी, अंकलखोप यासह इतर गावांमध्ये पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला.

हा रूटमार्च भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा रूटमार्च काढण्यात आला.

यावेळी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेदरम्यान निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

निवडणूक काळात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
रूटमार्चमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शांततापूर्ण व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!