दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी( शिराज शिकलगार)-:
रोटरीक्लब ॲाफ विटा सीटी ही सेवाभावी संस्थेची शाखा विटा शहरात २००५ साली करण्यात आली.त्यावेळीपासुन महाविद्यालयांना ग्रंथ वितरण,वृक्षारोपण ,स्वच्छता अभियान,वेगवेगळ्या स्मशानभुमीमध्ये विश्रांती बेंचीस,रक्तदान शिबिरे,अपंगाना व्हिल चेयर्स,जयपुर फुट,वापरण्यायोग्य कपडे वितरणासाठी युज अगेन प्रोजेक्ट,प्रबोधनपर व्याख्याने यांसारखे अनेक समाजउपयोगी उपक्रम सात्तत्याने राबवीले जात आहेत.याचाच एक भाग म्हणुन प्राथमिक शाळांमध्ये घरापासुन शाळा लांब असलेल्या ५० विद्यार्थीनींना १५ जुलै २०२६ रोजी प्रत्येकी सात हजार रुपये किंमतीच्या सायकल्स मोफत वीतरीत करण्यात येणार आहेत.
२०२६-२७ या नविन रोटरी वर्षासाठी Create Lasting Impact“दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक प्रभाव निर्माण करा.” ही थीम घेऊन नविन टीमचा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार असुन या कार्यक्रमामध्ये या सायकली सन्मानपुर्वक वीतरीत केल्या जाणार आहेत.
सचिन अब्दर,अध्यक्ष
सागर म्हेत्रे, सचिव
किरण तारळेकर,प्रसिद्ध विभाग प्रमुख
रोटरी क्लब ॲाफ विटा सिटी