एकदिलाने काम करूया, आमदार डॉ विश्वजीत कदम देतील तो काँग्रेसचा उमेदवार निवडूया : भिलवडी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार



दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे) :- भिलवडी जिल्हा परिषद गट आणि पलूस पंचायत समिती गण येथे एकदिलाने काम करूया आमदार डॉ विश्वजीत कदम देतील तो काँग्रेसचा उमेदवार निवडूया, असा निर्धार भिलवडी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला.
भिलवडी जिल्हा परिषद गट आणि पलूस पंचायत समिती गणातील निवडून संदर्भात भिलवडी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , युवक आणि ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत भिलवडी गाव जिल्हा परिषद गटात मोठं गाव आहे. भिलवडी गावाचा विकास या मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी जोमाने केले आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता नाही, परंतु या भागाचा विकास आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केला आणि यापुढेही करणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनीही भिलवडी गावासाठी मोठं योगदान दिले आहे, स्व संग्राम पाटील यांची सल भरून काढूया,असे अनेकांनी मत व्यक्त केली.
जिल्हा परिषद गट आणि पलूस पंचायत समिती गण निवडणुकीस वेळ कमी आहे. त्यामुळे वादविवाद न करता आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिलेला काँग्रेसचा उमेदवार निवडूया असा निर्धार यावेळी काँग्रेसच्या बैठकीत झाला.
या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



