रामानंदनगर येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज पलूस/रामानंदनगर:- रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे स्वर्गीय आमदार डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान श्रेष्ठ दान या राष्ट्रीय उपक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे.के बापू जाधव, वाचन चळवळीचे प्रणेते सुनील चव्हाण,वसंत दादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत तात्या, माजी प्राचार्य मुजावर सर, प्राचार्य डॉ. उज्वला पाटील, लेफ्टनंट संदेश दौंडे, उपप्राचार्य डॉ. गौरी पाटील इत्यादी मान्यवरांच्या समवेत रक्तदान शिबीर संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी जे.के.जाधव म्हणाले स्वर्गीय आमदार पतंगराव कदम साहेबांचे काम सामान्य माणसांसाठी खूप मोठे आहे. साहेबांनी नेहमीच सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून भरीव असे आणि शाश्वक असे काम केले आहे. त्यांच्यासारखे काम, दूरदृष्टी असणारा नेता होणे अशक्य आहे. रक्तदान शिबिराचे संयोजन राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना विभाग, हेल्थ सेंटर यांनी संयुक्तरीत्या केले. 50 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून रक्तदान यशस्वी केले. रक्तदान केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालया कडून कौतुक करण्यात आले.



