सांगली: हत्यारे, दारुगोळा बाळगून फिरण्यास मनाई

दर्पण न्यूज मिरज / सांगली :- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 सुरळीत, शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने व सांगली जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील क्षेत्रात दि. 14 जानेवारी 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची हत्यारे, दारुगोळा बाळगून फिरण्यास मनाई केली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.



