महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी -अंकलखोप येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिन

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे) :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे दिनांक 24 डिसेंबर 1939 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आले होते. त्यावेळी भिलवडी पंचशीलनगर येथील बौद्ध उपासक,उपासिका यांनी भेट घेऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले होते. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अंकलखोप येथे सभा झाली. याबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणात नोंद आहे. त्यामुळे भिलवडी -अंकलखोप येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 24 डिसेंबर 1939 रोजी भेट झाल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिन म्हणावा लागेल, असे अनेकांचे मत आहे.



