औंदुबर येथे 14. रोजी 83 वे सदानंद साहित्य संमेसलन
८३ व्या सदानंद साहित्य संमेसलनाच्या अध्यक्ष पदी प्रा.डॉ. सिसिलिया कार्वाेलो ; कवि संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल मडके १४ जानेवारी ला होणार संमेलन


दर्पण न्यूज भिलवडी/अंकलखोप -:
औदुंबर (ता.पलुस ) येथिल सदानंद मंडळाचे ८३ वे साहित्य संमेलन मकरसंक्रांती दिवशी बुधवार दि.१४ जानेवारीला होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वसई येथील विख्यात लेखिका प्रा.डॉ. सिसिलिया कार्वाेलो अध्यक्षपदी आहेत. तर कवि संमेलनाच्या अध्यक्ष पदी डॉ. अनिल मडके, सांगली हे आहेत. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यवाह, भारती विद्यापीठ, पुणे. मा. आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार आहे.सदानंद साहित्य मंडळाचे साहित्य संमेलन प्रत्येक वर्षाला मकरसंक्रांत या दिवशी होते. साहित्य संमेलनाचे हे ८३ वर्ष आहे. साहित्य संमेलनांचा फायदा या पंचक्रशीतील नवोदित कवि यांना चांगले व्यासपीठ मिळविण्यासाठी होत आहे. त्यानुसार यावर्षी साहित्य संमेलन दुपारी ४ वाजता प्रा. डॉ. सिसिलिया कार्यालो यांच्या अध्यक्षते खाली सुरू होणार आहे. प्रा.डॉ. सिसिलिया कार्यालो लेखिका असुन मराठीच्या प्राध्यापिका, आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून निवृत्त, कविता, कथा, ललित गद्य, आस्वादन संशोधनात्मक लेखन, साहित्य विषयक, चरित्रात्मक, बाल साहित्य, अनुवाद आणि संपादने आशी एकुन ४५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
ललित गद्य लेखन, आणि बाल साहित्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अनंत काणेकर, पु. ल. देशपांडे, मधुकर केचे, आणि ना. धो. ताम्हणकर असे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी बालभारती,उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम महामंडळावर संपादक म्हणून, मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.
तर कवि संमेलनाध्यक्ष डॉ.अनिल न. मडके हे व्यवसायाने
एमडी (चेस्ट) एफसीसीपी सांगली येथील ज्येष्ठ छातीरोग विशेषतज्ज्ञ, आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवि आणि वक्ते. जनस्वास्थ्य मासिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना विविध साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.साहित्य समेंलनाच्या प्रथम सत्रात दुपारी १२ ते ३ या वेळेत संपन्न होणा-या कवि संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ख्यातकीर्त कवयित्री डॉ. अनुपमा उजगरे, ठाणे या आहेत.
या संमेलनामध्ये कविता संग्रहासाठी सुधांशु पुरस्कार व कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत
या साहित्य संमेलनांनाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष शहाजी सुर्यवंशी, उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, कार्यवाह पु. ह. जोशी यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य करीत आहेत. तरी ८३ व्या साहित्य संमेलनांनासाठी साहित्यकांनी साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.



