राष्ट्रीय सेवा योजना नेतृत्व गुण दृढ करणारी प्रभावी चळवळ : प्रवीण रावताळे
रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज आणि कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयआयोजित राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विशेष संस्कार शिबिर


दर्पण न्यूज सांगली प्रतिनिधी: राष्ट्रीय सेवा योजना , ही युवकांना सामाजिक जाणीव सेवाभावी कर्तव्य भावांना आणि नेतृत्व गुण दृढ करणारी प्रभावी चळवळ असून श्रमसंस्कार शिबिराचे माध्यमातून येणारे अनुभव व्यक्तिमत्व विकासात आयुष्यभर उपयोगी ठरणारे आहेत असे प्रतिपादन घानवडचे सरपंच प्रवीण रावताळे यांनी केले
रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज आणि कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयआयोजित राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विशेष संस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री आर बोबडे होते.
पुढे बोलताना सरपंच रावताळे म्हणाले, हे केवळ शिबिर नसून श्रमसंस्कार आहेत श्रमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास होतो. प्राचार्य डॉ. सी .आर. बोबडे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, आपल्या तरुणांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा हा श्रमसंस्कार शिबिराचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण जीवनासंबंधीची जाणीव निर्माण होण्यासाठी हे शिबिर खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेची वरिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.प्रवीण बाबर यांनी प्रास्ताविकात सात दिवस चालणाऱ्या या शिबिराचा हेतू व विविध उपक्रमांची माहिती दिली.याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सुरेश पुजारी यांनी उपक्रमांची प्रशंसा केली आणि स्वयंसेवकांनी सेवाभाव अनुशासन आणि सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत समाज भान जोपासणारे आवाहन केले.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व रोपाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी पाटील यांनी केले तर आभार ज्युनिअर विभागाचे कार्यक्रमधिकारी प्रा. दिलीप जाधव यांनी मानले .या उद्घाटन समारंभास ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सर्जेराव सावंत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन जगताप, प्रा. डॉ.झुंजारराव कदम प्रा. संताजी सावंत, प्रा.अजित साळुंखे, प्रा.आप्पासो वानकर, प्रा. संतोष कदम, कार्यक्रमाधिकारी सौ रंजना बागल, प्रा. संकेत राठोड, सौ साईका तांबोळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य , ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



