महाराष्ट्रराजकीय

सांगली महापालिकेच्या प्रभाग 17 मध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; बसवराज उर्फ सियाराम पाटील

 

दर्पण न्यूज मिरज/सांगली(अभिजीत रांजणे) -: सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या  निवडणुकीमध्ये प्रभाग सतरामधून मला लोकांचा सहानभूतीपूर्वक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती बसवराज पाटील उर्फ सियाराम यांनी दिली.

बसवराज पाटील उर्फ ज्यूनियर रजनीकांत, सियाराम यांनी सांगितले की ,प्रभाग सतरामध्ये लोकांना घेऊन विविध सामाजिक उपक्रम मी राबवतो आहेत. या प्रभागातील बापट मळा या ठिकाणी हनुमान जयंती तसेच वटसावित्री पौर्णिमा अशा विविध सामाजिक उपक्रमामध्ये माझा सहभाग असतो .या सामाजिक उपक्रमामध्ये महिला आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सामान्य माणसाची कामे काय असतात,  ज्येष्ठ नागरिकांची कामे काय असतात, उच्चवर्णीय लोकांची कामे काय असतात ,मध्यमवर्गीयांची काय कामे असतात याचा मी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. लोकांच्या अडीअडचणींना मी नेहमीच पुढाकार घेऊन त्या सोडवत असतो. या प्रभागामध्ये निवडणुकीला उभे राहण्याचे कारण हेच की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधा लोकांना मिळत नाहीत. अनेक ठिकाणी लोकांची गैरसोय होते. युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना अनेक समस्यांना या वार्ड नंबर 17 मध्ये सामोरं जावं लागतं, याची जाणीवपूर्वक मला कल्पना आहे. त्यामुळे प्रभाग 17 मध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तसेच येथे पायाभूत सुविधा आणि लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी मला संधी देण्यासाठी मी प्रथमच ते निवेदनाद्वारे लोकांच्या घरी घरी पोहोचत आहे. लोकांची संवाद साधताना या वार्ड नंबर 17 मध्ये आपणच निस्वार्थी योग्य उमेदवार आहात, अशा प्रकारच्या भावना लोकांतून व्यक्त होताना दिसत आहेत. मुळात माझा व्यवसाय टेलर असल्यामुळे आणि मी टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा राज्याध्यक्ष असल्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून मी अनेक गोरगरीब ,गरजू लोकांचा उद्धार केलेला आहे. विकास केला आहे. त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि माझे मार्गदर्शक सहकारी मित्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याच्या जोरावरच प्रभाग 17 साठी मी चांगला निधी खेचून आणू शकतो. आणि लोकांचा विकास करू शकतो अशी माझी प्रांजल भावना आहे, असेही इच्छुक उमेदवार बसवराज पाटील उर्फ सियाराम यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या भावना मी प्रकट केल्यानंतर लोकांमध्ये मला चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. असेही बसवराज पाटील यांनी दर्पण न्यूजशी बोलताना सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!