लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन चेस अकादमी इचलकरंजी आयोजित नऊ वर्षाखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अवनीश जितकर अजिंक्य; बेळगावचा रिधान कलघटगी उपविजेता तर वैभववाडीचा विहान अस्पतवार तृतीय

दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकादमी इचलकरंजी आयोजित नऊ वर्षाखालील खुल्या मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा *केन बुद्धिबळ विजेता २०२५** लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी च्या सभागृहामध्ये आज मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .
बेळगाव,सिंधुदुर्ग,सांगली, कोल्हापूर,जयसिंगपूर, निपाणी,गडहिंग्लज व स्थानिक इचलकरंजी
मधील एकूण 100 नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार खुल्या नऊ वर्षाखालील मुलांमुलींच्या गटात एकूण आठ फेऱ्यात ही स्पर्धा झाली.स्पर्धा संचालक लायन्स कृष्णावतार भराडिया ,लायन्स लिंगराज कित्तूरे ,लायन्स अरुण पाटील व केन बुद्धिबळ अकादमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ यांच्या हस्ते विजेत्याना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि पदके देवुन स्पर्धेच बक्षीस समारंभ करण्यात आला. यावेळी रेश्मा नलवडे (शाळेत बुद्धिबळ -वरिष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक महाराष्ट्र ), मुख्य पंच करण परीट (वरिष्ठ राष्ट्रीय पंच) व विजय सलगर (राज्य पंच) करण दबडे ,अथर्व तावरे (आंतरराष्ट्रीय रेटिंग खेळाडू ) यांच्यासह बुद्धिबळपटू व पालक उपस्थित होते. केन चेस अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ ( वरिष्ठ राष्ट्रीय पंच) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले.
अंतिम आठव्या फेरीनंतरचा निकाल
पुढीलप्रमाणे
क्र.१.अवनीश जितकर कोल्हापूर , क्र.२.रिधान कलघटगी बेळगाव, क्र.३.विहान अस्पतवार सिंधुदुर्ग , क्र.४.अनुप कानडे कोल्हापूर, क्र.५.शिवांश सुतार (इचलकरंजी). *सर्वोत्तम मुली* १.नारायणी घोरपडे २.प्रणिता माडोळी ३.शनाया मालानी
*उत्तेजनार्थ बक्षिसे.* १.कुमार ईशान २.सांची बजाज ३.आदित्यराज निंबाळकर.
*८ वर्षांखालील सर्वोत्तम*
१.कौशिक केशव २.अर्णव वरूटे ३.अनिरुद्ध साळुंखे
*७ वर्षांखालील सर्वोत्तम*
१.नक्षत्रा कांबळे २.शेडसाले ३.रिद्धान करवा.
*६ वर्षांखालील सर्वोत्तम*
१.आरव पाटील २.श्रेयस पांडव ३.राजवीर उंडुरे
*सर्वात लहान मुलगा* – रिशान पिलंकर, *सर्वात लहान मुलगी* निहारिका कांबळे
*केन अकादमीचा सर्वोत्तम मुले*.
१.सुयोग काकाणी २.हर्ष मादनाईक ३. शंभूराज केने
*केन अकादमीची सर्वोत्तम मुली*.
१.अनुश्री भिलवडे २. अद्विता ऐतवडे
आयोजका कडुन सर्व खेळाडूना नाश्ताची सोय सुप्रसिद्ध श्रीराम इडली दिली.वेळ व्यवस्थापन , सर्वोत्तम नाश्ता ,प्रमाणपत्र,आकर्षक ट्रॉफी, पदके, स्वच्छ आणि मोठा हॉल, बुद्धिबळ घड्याळ आणि बुद्धिबळ इत्यादी. चांगल्या गोष्टी उपलब्ध . सर्व खेळाडू व पालक यानी केन चेस अकादमी व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी “केन बुद्धिबळ विजेता २०२५” टूर्नामेंटचे व टीम चे कौतुक केले.



