उक्कडगाव येथील सोनवणे कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद


धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे)
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे- अमर अमित कोंढारे, यश मारकड, सौरभ समुद्रे, सर्व रा. चंद्रभानु सोनवणे कॉलेज उकडगाव चोराखळी शिवार ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.21.12.2025 रोजी 01.00 वा. सु. चंद्रभानु सोनवणे कॉलेज उकडगाव चे हॉस्टेल चोराखळी शिवार येथे फिर्यादी नामे-प्रशिक अमित बनसोडे, वय 17 वर्षे, रा. ताटे, प्लॉट जवळ पंचशील नगर वैराग ता. बार्शी जि.सोलापूर यांना नमुद आरोपींनी तु छाती बाहेर काढुन का चालतो लय शाईनिंग मारतो असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी स्टम्प, हँगर व काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशिक बनसोडे यांनी दि.23.12.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351)2) (3), 3 (5), सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3 (1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



