ईश्वरपूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा वंचित बहुजन युनियनकडून तीव्र निषेध
नराधमांना कठोर शिक्षा द्या :पीडितेस तात्काळ न्याय द्या : वंचित बहुजन माथाडी युनियनची ठाम मागणी ; जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिले निवेदन


दर्पण न्यूज मिरज/सांगली :- ईश्वरपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष व घृणास्पद लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. सदर प्रकरणातील दोन आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी हा गुन्हा मानवतेला काळिमा फासणारा असल्याचे मत आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांनी व्यक्त केले आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार म्हणजे संविधान व मानवतेवर हल्ला
अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा केवळ गुन्हा नसून तो भारतीय संविधान, मानवी हक्क व स्त्री-सुरक्षेवर थेट आघात आहे. अशा नराधमांवर POCSO Act अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक असून, कोणत्याही परिस्थितीत आरोपींना जामीन मिळता कामा नये, अशी ठाम भूमिका युनियनने मांडली आहे.
पीडितेस तात्काळ संरक्षण व पुनर्वसन द्यावे
युनियनच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, पीडित अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबाला
▪️ तात्काळ पोलीस संरक्षण
▪️ वैद्यकीय व मानसिक समुपदेशन
▪️ मोफत कायदेशीर मदत
▪️ शासन नियमानुसार आर्थिक सहाय्य
पुरवण्यात यावे.फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा
सदर प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत जलद निकाल लावून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी ठाम मागणी युनियनने केली आहे.
प्रशासनाला इशारा
जर या प्रकरणात कोणतीही हलगर्जी, दिरंगाई किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा
लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, निदर्शने व राज्यव्यापी आवाज उठवेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.“अल्पवयीनांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही – न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!”
असा ठाम निर्धार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने व्यक्त केला आहे. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, किशोर आढाव, सुषमा कांबळे, तेजस्विनी कांबळे, कस्तुरी गवळी, सुमन कामत,जगदिश कांबळे, अनिल मोरे सर, हिरामण भगत, युवराज कांबळे, पवन वाघमारे, ऋषिकेश माने, अनिल सावंत, दिपक कांबळे, श्रीकांत ढाले, राजेंद्र सावंत, वैभव कांबळे, प्रतिक सदामते, मोहन गवळी, दशरथ गायकवाड, ज्ञानेश्वर गवळी, मोहन साबळे,गोरख कांबळे, संदिप कांबळे, सुरेश सराटीकर आदी वंचित बहुजन आघाडी आणि युनियन तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.



