सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

दर्पण न्यूज मिरज/ सांगली : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नागरी हक्क संरक्षण पथकाच्या एस. व्ही. वागलगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एच. कळेकर यांच्यासह आरोग्य व पोलीस यंत्रणांचे तालुकास्तरीय संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई, गंभीर गुन्ह्यांतील पीडितांच्या वारसांचे पुनर्वसन आदिंचा आढावा घेतला. निधी प्राप्त झालेली प्रकरणे तात्काळ निर्गत करावीत. प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.
यावेळी बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा समितीसमोर दिला.



