
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने):-
संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन सेना धाराशीव च्या वतीने कळंब येथे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली होती संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कळंब येथे संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्यात आला आनंदराज आंबेडकर साहेब व उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांचा संविधान प्रत व हार व शाल देऊन तसेच आलेल्या सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांना संविधान प्रत देऊन सत्कार करण्यात आला या संविधान सन्मान महोत्सवाला उत्तर देताना आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी धाराशीव जिल्ह्य़ातील तरुणांना भावनिक आवाहन केले तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो असे वक्तव्य केले. वर्षानुवर्ष रस्त्यावर लढून ज्या तरुणांचे आयुष्य चळवळीच्या नावाखाली उध्वस्त करण्यात आले त्या तरुणांना सत्तेची स्वप्न दाखवण्याचा कार्यक्रम मी करत आहे आमच्या तरुणांमध्ये असलेलं कॅलिबर आमच्या तरुणांमध्ये असलेलं कौशल्य सत्तेमध्ये नेऊन त्यांचा उज्वल भविष्य करण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे आज देशामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये जी परिस्थिती निर्माण केली जात आहे खरं तर ही परिस्थिती निर्माण करण्यामागे ब्राह्मणवाद्यांचे फार मोठे षडयंत्र चालू आहे आणि ते षडयंत्र रोखण्यासाठी आपण सत्तेमध्ये जाणं काळाची गरज आहे आपण बाहेर राहून सत्तेमध्ये चाललेलं षडयंत्र रोखूच शकत नाही बाहेर राहून आपण फक्त आपलं आयुष्य उध्वस्त करून घेऊ शकतो त्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे आणि म्हणून सत्तेमध्ये जाण्यासाठी आपल्या लोकांना सत्तेमध्ये पाठवण्यासाठी मी रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती केलेली आहे ही युती हा एक कार्यकर्त्या साठी प्लॅटफॉर्म आहे आपल्या लोकांना सत्तेमध्ये पाठवण्याची माझी एक डिप्लोमसी आहे ही राजकीय डिप्लोमसी तुम्हाला सत्तेमध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे म्हणून मी जोपर्यंत तुम्हाला सत्तेमध्ये पोहोचवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही हा माझा विश्वास आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी मिळून मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उपस्थित तरुण कार्यकर्ते यांना केले या संविधान सन्मान सभेसाठी महिला व तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष धाराशीव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल हजारे यांनी प्रास्ताविक केले या संविधान सन्मान सभेला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा सुशील सूर्यवंशी महाराष्ट्राचे नेते प्राचार्य सुनील वाकेकर महाराष्ट्राचे नेते प्रा युवराज धसवाडीकर जिल्ह्याचे प्रभारी कपिल सरोदे व महाराष्ट्राचे नेते मुजीब भाई पठाण माधव दादा जमदाडे यशवंतभैय्या भालेराव यांनी संबोधीत केले यावेळी जिल्ह्य़ातील शंकर माने सुमित साबळे काका शिकरे तांबे मामा विजय शितोळे भगवान हजारे
नागेश जाधवअमित माने
चंद्रवर्दन माने तसेच बीड येथील मुस्लिम कार्यकर्ते रफिक शेख व ईतर कार्यकर्ते यांनी देखील यावेळी पक्ष प्रवेश केला संविधान सन्मान सभेसाठी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा सुशील सूर्यवंशी महाराष्ट्राचे नेते प्राचार्य सुनील वाकेकर महाराष्ट्राचे नेते प्रा युवराज धसवाडीकर जिल्ह्याचे प्रभारी कपिल सरोदे व महाराष्ट्राचे नेते मुजीब भाई पठाण माधव दादा जमदाडे यशवंतभैय्या भालेराव प्रा शिध्दोधन मोरे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल हजारे मुजीब भाई पठाण सुरज वाघमारे सतपाल बचुटे राहुल गाडे गौतम बनसोडे आदमाने शरद सायस हजारे आप्पासाहेब हजारे पवन हजारे सुहास इंगळे अनिल गायकवाड अजय माने हिराताई ओव्हाळ बबन सोनटक्के आशोक थोरात सतिश शिंदे प्रदिप ताकपिरे अमोल मस्के उत्तम सावंत अमोल पवार रविंद्र ओव्हाळ उत्तम पाचपिंडे अरूण कांबळे जय कांबळे रविंद्र ओव्हाळ यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जहिर एकनाथ यांनी केले व आभार सुरज वाघमारे यांनी व्यक्त केले.



