गुगवाड येथील अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड संचलित धम्मभूमी बुद्ध विहाराचा वर्धापन दिन, धम्म परिषद उत्साहात
उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन : देशभरातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग









दर्पण न्यूज जत गुगवाड -: सांगली जिल्हा जत तालुक्यातील गुगवाड येथील अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड संचलित धम्मभूमी बुद्ध विहार वर्धापन दिन व धम्म परिषद उत्साहात झाली. या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
. प्रसिद्ध उद्योगपती व धम्मभूमी गुगवाडचे संस्थापक मा.सी.आर.सांगलीकर यांनी अध्यक्षपद भूषविले.तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरातून रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महार रेजिमेंट जवान यांच्याकडून सलामी देत धम्मध्वजास अभिवादन केले व भदंत प्रा. डॉ. यशकाश्यपायन महाथेरो व भदंत गोविंदो मानदो आणि भिक्खू संघ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघाच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सम्राट अशोक हॉलमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून धम्मपरिषदेला सुरुवात झाली. कालकथित अथर्व सांगलीकर यांच्या प्रतिमेस अपर्णा सांगलीकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दयानंद कांबळे यांनी केले. प्रस्तावना प्रा. बाळासाहेब कर्पे यांनी केली. भिक्खू संघाकडून उपासक-उपासिकाना धम्म देसना देण्यात आली. भिक्खू संघाना चिवरदान करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता व आभार महेश शिवशरण यांनी केले. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक मधील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भदंत प्रा.डॉ. यशकाश्यपायन महाथेरो,भदंत गोविंदो मानदो, भंते श्रीसारा,भंते धम्मदिप भंते नागसेन, ज्येष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे, भिक्खू संघ, दै.सम्राट वृत्तपत्रचे संपादक कुणाल कांबळे व कोल्हापूरचे पत्रकार रमेश रत्नाकर, अथर्व निधी बँक चेअरमन तृप्ती कांबळे, साधनाताई अढाव (नाशिक), अमर कांबळे, सभापती बाळासाहेब कांबळे, ॲड.सुगंध वाघमारे,ॲड.भारत शिंदे, जितेंद्र कोलप, श्रद्धा सनमडिकर, रमेश डोंगरे, पत्रकार अभिजीत रांजणे, उपासक, उपासिका आदिसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.


