महाराष्ट्रराजकीय
जिल्हा परिषद, पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी तहसिल कार्यालयात उपलब्ध

दर्पण न्यूज भिलवडी / सांगली -: राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली असून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील अंतिम मतदार याद्या संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी माहितीसाठी ठेवण्यात आल्या असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदार केंद्र निहाय मतदार यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


