वसगडे येथे स्व. अरविंददादा पाटील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था नवीन इमारतीचे उद्घाटन ; विकासकामांचे भूमिपूजन ; आमदार डॉ विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती



दर्पण न्यूज भिलवडी/वसगडे:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे येथे स्व. अरविंददादा पाटील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार डॉ विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती होती.
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, या संस्थेमुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक विकास होणार आहे. स्व डॉ पतंगराव कदम आणि स्व. अरविंददादा पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वसगडे गावच्या विकासासाठी माझा नेहमीच हातभार असणार आहे, असे आश्वासन ही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी यावेळी दिले.
यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
वसगडे येथे
1. आमदार निधीमधून बसस्थानक ते सार्वजनिक स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे. ₹१० लाख
2. जनसुविधा निधी अंतर्गत सुधीर जाधव घर ते अशोक भेंडवडे घर रस्ता डांबरीकरण करणे. ₹१० लाख
3. १५ वा वित्त आयोग निधीतून निलेश शिंदे घर ते शिरोटे घर रस्ता डांबरीकरण — ₹५ लाख
4. बाळासाहेब ठाकरे ग्रामसमृद्धी योजनेमधून नवीन ग्रामसचिवालय इमारत बांधकाम करणे. ₹२५ लाख
5. १५ वा वित्त आयोग मधून रामगोंड पाटील घर ते जयपाल खोत घर बंदिस्त गटर बांधकाम — ₹७ लाख याचा समावेश आहे.यावेळी संचालक,सभासद , महिना , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


