डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगामास प्रारंभ





दर्पण न्यूज कडेगांव/पलूस : — डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या २६ व्या गळीत हंगामास आज गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन माजी आमदार श्री. मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांची सपत्नीक उपस्थिती होती.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, कारखान्याने आजपर्यंतचे सर्व हंगाम शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे यशस्वी केले आहेत. चालूवर्षी कारखान्याने १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गळीतासाठी कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन करून ते म्हणाले की स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा आदर्श घेऊन सोनहिरा कारखाना शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि निकोप सहकाराच्या बळावर कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे , यापुढे शेतकरी सभासद यांच्या सहकार्याने होईल, असे ही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी खासदार विशालदादा पाटील व इतर मान्यवर शेतकरी सभासद उपस्थित होते.


