सामाजिक बांधिलकी जपत ‘स्वामी नारायण टेकडी मॉर्निंग वॉक ग्रुप ‘ सामाजिक संस्थेने दिवाळी फराळ वाटप


दर्पण न्यूज कडेगांव :- समाजातील जेष्ठ नागरिका प्रती आपुलकी व आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने नरे आंबेगाव येथील एस्टोनिया रॉयल, सुप्रभात योगा ग्रुप, सिंहगड ट्रेकर्स, स्वामी नारायण टेकडी मॉर्निंग वॉक ग्रुप, हिदायक चॅरिटेबल ट्रस्ट कडेगाव, या सामाजिक संस्थानी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक प्रशंसनीय उपक्रम राबविला.
या उपक्रमा अंतर्गत ग्रुपच्या सदस्यांनी माय माऊली वृद्धाश्रमला भेट देऊन तेथील रहिवाशांना दिवाळी फराळ वाटप केले आपल्या मुलांपासून दूर राहणाऱ्या आणि एकाकी जीवन जगणारे वृद्ध नागरिक या छोट्याशा प्रेमळ भेटीने भावुक झाले
या प्रसंगी ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांच्यासोबत काही क्षण आनंदाचे घालवले. “समाजातील या मात्यापित्यांसाठी काहीतरी करणे ही आपची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, हेच आमच्या दिवाळीचे खरे समाधान आहे ” असे सदस्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील इतरांनी ही अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी अशी भावना व्यक्त करण्यात आली दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरला आहे
या प्रसंगी श्री संदीप बेलदरे अध्यक्ष भाजपा हवेली मंडळ पुणे. श्री रमजान शेख अध्यक्ष चॅरिटेबल ट्रस्ट कडेगाव श्री संतोष (बापू) ताटे हवेली मंडळ पुणे,श्री खैरे सर सामाजिक कार्यकर्ते, श्री विठ्ठल वरुडे पाटील अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर पुणे, रामभाऊ लगड (सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवर उपस्थित होते


