करंजफेन येथील राजू गांधी दूध संस्थेमध्ये दिवाळी भेटवस्तूचे वाटप

कोल्हापूर, अनिल पाटील
राजीव गांधी दूध संस्थेच्या संचालक मंडळाने दूध उत्पादकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विश्वस्त भावनेने संस्थेचा कारभार केल्यामुळे दूध संस्था सभासदांना उच्चांकी दरफरक आणि दिवाळी भेटवस्तू वाटप करू शकली आहे. असे उद्घार गोकुळचे निवृत्त दूध संकलन अधिकारी आशिष पाटील यांनी काढले.
करंजफेण ता. राधानगरी येथील राजीव गांधी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना दूध दर फरक वाटप आणि भेटवस्तू वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक कृष्णा भाऊ वागरे हे होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सभासद विक्रम वागरे यांनी केले.
दुध संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असून संस्थेने आता स्वमालकीची इमारत बांधावी असे आवाहनही यावेळी अशिष पाटील यांनी संचालक मंडळाला केले. यावेळी श्री . पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादकांना भेटवस्तू आणि पाच लाख रुपये दर फरक वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक कृष्णा भाऊ वागरे, आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्कार प्राप्त संस्थेचे सभासद दत्तात्रय मोहिते, संस्थेत 31 वर्षे सेवा बजावलेले सचिव रंगराव वागरे, हरी अलंगदार, यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ह. भ. प .युवराज वागरे, दत्तात्रय मोहिते, अमृता वागरे, रंगराव वागरे यांचीही
भाषणे झाली.
कार्यक्रमास उपसरपंच बंडोपंत मोहिते ,संस्थेचे चेअरमन मारुती वागरे, व्हा.चेअरमन युवराज वागरे, गोकुळचे विस्तार अधिकारी सतीश पवार माजी उपसरपंच वसंत कांबळे, बंडोपंत वागरे, शिवशंभो विकास संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार रणजीत वागरे यांनी मानले.


