इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी बबनराव धायतोंडे तर उपाध्यक्षपदी दत्ता पारेकर यांची बिनविरोध निवड

दर्पण न्यूज इंदापूर :- इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाची निवड सभा इंदापूर रेस्ट हाऊस येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात संघाची नवीन कार्यकारिणी सत्यजित रणवरे व शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवडण्यात आली.
या कार्यकारिणीत अध्यक्षपदी बबनराव धायतोंडे, उपाध्यक्षपदी दत्तात्रेय पारेकर, सचिवपदी दत्तात्रेय मिसाळ, खजिनदारपदी अरुण भोई, कार्याध्यक्षपदी अतुल सोनकांबळे व धनाजी शेंडगे, सहखजिनदारपदी महेश कळसाईत, तर प्रसिद्धी प्रमुखपदी प्रवीण पिसे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमात सत्यजित रणवरे व शिवाजी पवार यांनी नव्या कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले. पत्रकार बांधवांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक भान राखणाऱ्या पत्रकारितेसाठी संघ एकजुटीने कार्य करेल, असा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निवड कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.


