आरोग्य व शिक्षणग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
इंजिनिअर राजू चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सोलापूर जिल्हा परिषद शाळा मनगोळी पूरग्रस्त शाळेत शालेय वस्तू वाटप






दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी -माळवाडीचे दानशूर व्यक्तिमत्व आर के कंट्रक्शन सर्वेसर्वा इंजिनिअर राजू चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आर के कंट्रक्शन आणि त्यांच्या कामगारांच्या वतीने 10/10/2025 रोजी सोलापूर भागातील जिल्हा परिषद शाळा मनगोळी या ठिकाणील पूरग्रस्त शाळेला शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
माळवाडी बांधकाम कामगार यांनी मिळून यांनी एक हात मदतीचा म्हणून फुल न फुलाची पाकळी म्हणून सोलापूर मधील पूरग्रस्त भागांमध्ये स्वतः जाऊन या वस्तू देण्यात आल्या .
यामध्ये इंजिनिअर राजू चौधरी, समीर सुतार , ओंकार इरकर ,प्रशांत सोळवंडे , रमजान चौधरी व पूर्ण बांधकाम वर्ग माळवाडी यांच्या सहभागाने हा उपक्रम घेण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाचे कौतुक सर्व ठिकाणी होत आहे.


