अंकलखोप -औंदुबर येथे कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूहाचे कृषी सेवा केंद्र व हाय-टेक नर्सरीचा शुभारंभ
शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, उच्च प्रतीची बियाणे, रासायनिक खते, विद्राव्य खते, तसेच नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार

दर्पण न्यूज भिलवडी /औंदुबर :-
शेती क्षेत्रात प्रगतीशील व शाश्वत शेती पद्धतीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, उच्च प्रतीची बियाणे, रासायनिक खते, विद्राव्य खते, तसेच नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूह या कृषी सेवा केंद्र व हाय-टेक नर्सरीचा शुभारंभ गुरूवार दि.२ आॅक्टोंबर २०२५ रोजी विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर औदुंबर फाटा, अंकलखोप येथे झाला.
पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूह या कृषी सेवा केंद्र व हाय-टेक नर्सरीचे सर्वेसर्वा
अक्षय पाटील व शुभम पाटील (B.Sc. Agriculture, MBA) यांच्या पुढाकारातून उदयसिंह पाटील काका,अरुण पाटील,रवी पाटील,दिलीप पाटील नाना,अनिल पाटील,अवधूत पाटील,प्रमोद सूर्यवंशी,डॉ. अतुल पाटील,सुभाष पाटील,गौरव पाटील यांच्यासह परिसरातील प्रगतशील व आघाडीचे शेतकरी, मान्यवर व्यक्ती, तरुण उद्योजक यांच्या उपस्थितीत कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूह या कृषी सेवा केंद्र व हाय-टेक नर्सरीचा शुभारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे केंद्र एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून रासायनिक खते व बी-बियाणे : प्रमाणित व उच्च प्रतीचे बियाणे तसेच रासायनिक व विद्राव्य खते सहज उपलब्ध होणार आहे.तसेच पीक मार्गदर्शन यामध्ये ऊस तसेच सर्व पिकांसाठी लागवडीपासून काढणीपर्यंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष पीक पाहणीमध्ये तज्ज्ञ कृषी पदवीधरांकडून शेतात भेट देऊन समस्या ओळखून योग्य उपाय सुचवणे.तसेच हाय-टेक नर्सरीमध्ये आधुनिक पद्धतीने तयार केलेली रोगमुक्त, सक्षम रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.त्याचबरोबर वन-स्टॉप सोल्यूशन : शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती व सामग्री एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी बोलताना अक्षय पाटील म्हणाले की,शेतकऱ्यांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून,
“कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूहाचा उद्देश केवळ खते किंवा बियाणे विक्री करणे नसून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीची दिशा दाखवणे, त्यांना वैज्ञानिक शेती पद्धतीकडे वळवणे आणि अधिक उत्पादनासोबतच चांगला नफा मिळवून देणे हा आहे.”
यावेळी शुभम पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “आजच्या तरुण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, उच्च प्रतीचे साहित्य आणि तंत्रज्ञान मिळाल्यास त्यांची शेती नक्कीच लाभदायी होऊ शकते. त्यासाठीच हे केंद्र सुरु केले आहे.”
कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूह या कृषी सेवा केंद्र व हाय-टेक नर्सरीच्या शुभारंभामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,या शुभारंभानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. “आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी फिरून खते, बियाणे व मार्गदर्शन घ्यावे लागत होते. आता सगळं एकाच ठिकाणी मिळणार असल्याने वेळ, पैसे व श्रम यांची बचत होईल,” अशा प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
कृषीनिष्ठा कृषी उद्योग समूहाची निर्मिती केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील शेतीत नवे तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.