क्राईम
सी.पी. आर रूग्णालयात केसपेपर काढताना इमारतीचा जिर्ण झालेला भागाचा स्लॅब कोसळून एकजण जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणार्या सी. पी. आर रूग्णालयाच्या बाह्यविभागामध्ये केसपेपर काढतानां इमारतीचा जिर्ण झालेल्या भागाचा स्लॅब ङोक्यात पङून एक जण जखमी झाला. राजू तय्यब (वय 46) रा. जवाहरनगर”कोल्हापूर असे त्यांचे नाव आहे. हा अपघात सकाळी साङेबारा वाजण्याच्या सूमारास घङला.
ते सकाळी आपली दाङ दूखत असल्याने ती दाखविण्यासाठी सी.पी.आर मध्ये आले होते. केसपेपर काङून जात असताना इमारतीचा जिर्ण झालेला भागाचा स्लॅब त्यांच्या ङोकीवर पङला.यामध्ये ते रक्तबंबाळ झालेत. त्यांच्या ङोकीला तीन टाके बसल्याचे समझते.