महाराष्ट्र
ज्येष्ठ पत्रकार एन.एस.पाटील यांची तक्रार निवारण समितीवर निवड

कोल्हापूर :अनिल पाटील
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत, राज्य तक्रार निवारण समिती वर
प्रादेशिक विभाग कोल्हापूर,फेस्कॉमचे सदस्य, जिवबानाना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एन. एस. पाटील सर यांची निवड करण्यात आली.
महात्मा फुले जन आरोग्य योजना ,राज्य तक्रार निवारण समिती वर श्री एन.एस.पाटील यांची निवड झाल्याचे पत्र कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेस्कॉमचे अध्यक्ष दिलीप पेटकर यांचे हस्ते देण्यात आले. या वेळी कोल्हापूर फेस्कॉमचे उपाध्यक्ष पी.डी. मोरे “श्रीकांत
आडीवरेकर ,डॉ.मानसिंग जगताप ,एस.बी नलवडे,शांताराम पाटील (बापू), रमेश पाटील ,मेजर पोपटराव ,म़ंगल पाटील,तुकाराम बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.