महाराष्ट्रसामाजिक

सोन्याची मंदिरे उभी करण्यापेक्षा, जीवन शिक्षण मंदिरे उभी करा : पोपट आबा खोसे

 

कर्जत दर्पण न्यूज  :-   रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये कर्मवीर जयंती निमित्त प्रबोधन सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आले.
सुश्राव्य सनई वादन आणि ढोल ताशाच्या गजरात शिक्षणप्रेमी नागरिक,प्रमुख अतिथी व वक्ते यांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे व ज्येष्ठ लेखनिक कैलास ढोबे यांनी स्वागत केले.
विद्यालयातील विद्यार्थिनी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने रेखाटलेल्या आणि आकर्षक रंगसंगतीने रंगविलेल्या आखीव रेखीव रांगोळ्यांच्या प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन पोपट आबा खोसे यांनी केले . उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थी मधील कलागुणांचे कौतुक केले.
विद्यालयातील प्रसिद्धी विभागाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे माजी सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजी तापकीर साहेब यांनी केले. सन 2025 -26या शैक्षणिक वर्षातील विद्यालयातील सांस्कृतिक व मिनी गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित वैशिष्ट्यपूर्ण शालेय व सहशालेय उपक्रमांचे प्रतिथयश वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्यांचे एकत्रित सादरीकरण करण्यात आले होते तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुनील अर्जुन गोरखे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, विविध विषयांवर महाराष्ट्रभर दिलेली व्याख्याने, वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक कथा, स्तंभलेखन, प्रवास वर्णन, ललित लेखन आणि विविध विषयांवरील प्रकाशित कविता व गझला, इंग्रजी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील ज्ञानरचनावादी पद्धतीने सादर केलेल्या विविध उपक्रमांची माहिती इत्यादी बाबींचे प्रदर्शन पाहून मान्यवर प्रभावित झाले.

विद्यालयास लाभलेले दानशूर व्यक्तिमत्व माजी सरपंच सचिन दरेकर, रूपचंद गांगर्डे, विद्यालयातील विद्यार्थ्यांना 2000 वह्यांचे वितरण करणारे ज्ञानेश्वर बलभीम गांगर्डे, विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे रंगकाम व अक्षर लेखन करणारे माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय सदस्य यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अनेक दानशूर व्यक्तीने विद्यालयात ठेवलेल्या ठेवींच्या माध्यमातून मागील शैक्षणिक वर्षातील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुनील अर्जुन गोरखे यांनी त्याच्या मातोश्री स्वर्गीय सौ.केशर अर्जुन गोरखे यांच्या स्मरणार्थ एसएससी परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या प्राची संदीप गांगर्डे हिस 1001 रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले.

याप्रसंगी दत्ता काकडे व विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका गांगर्डे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या पारितोषकांची घोषणा केली.
कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने विद्यालयात घेतलेल्या वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, इंग्रजी पोस्टर प्रेझेंटेशन, इंग्रजी शब्द संपत्ती वृद्धी प्रकल्प, इंग्रजीमध्ये आईस पत्र लेखन इत्यादी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र आणि यशस्वी स्पर्धकांचा फोटो असलेल्या वह्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयातील सर्व शिक्षकांनी गरीब विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप केले.
याप्रसंगी विद्यालयात नवरात्रीच्या निमित्ताने दररोज घेतल्या जाणाऱ्या “नवदुर्गा विद्यार्थिनी व्याख्यानमाला व नारीशक्ती सन्मान सोहळा”या उपक्रमांतर्गत वैष्णवी दीपक जगधने या विद्यार्थिनीने “मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील बोलतेय..”हे स्वगत सादर केले आणि राजश्री रावसाहेब गांगर्डे या माता पालकाचा ओटी भरून शाल श्रीफळ यासह सन्मान करण्यात आला.
भारतीय समाज विकास आणि संशोधन संस्था, युक्रांदचे सन्माननीय सचिव आप्पा अनारसे यांनी रयत शिक्षण संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदान आणि विद्यार्थ्यांची कर्तव्ये आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्यातून समजावून सांगितली.
महाराष्ट्रभर पर्यावरण क्षेत्रात व शाश्वत शेती विकासात भरीव कार्य करणारे जेष्ठ पर्यावरण तज्ञ आणि विनोबा भावे प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष पोपट आबा खोसे यांनी पाषाणाच्या मंदिरांना उभारणीसाठी देणग्या देण्यापेक्षा सुसंस्कारित पिढी घडवणाऱ्या ज्ञान मंदिरांना उभारी देण्याचे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.
शिवाजीराव बापू गांगर्डे ,मारुतीराव गांगर्डे चेअरमन ,धनराज बापू गांगर्डे,अमोल नामदेव गांगर्डे ,रूपचंद गोविंद गांगर्डे ,संदीप भंडारी,अनिल गांगर्डे ,गोरख गांगर्डे ,संतोषराव शेलार
कुंडलिकराव गांगर्डे ,दत्तात्रय काकडे,सचिन राव दरेकर
शिवाजीराव तापकीर साहेब ,अर्जुन तापकीर सर ,कानिफनाथ सुद्रिक, ज्ञानेश्वर गावडे ,नारायणराव तापकीर,खंडागळे साहेब ,वैभव गांगर्डे, किशोर गांगर्डे, अश्विनी महेंद्र गांगर्डे प्रवीण गांगर्डे, रामकृष्ण जगदाळे, संदीप गवारे, शिवाजी रघुनाथ गांगर्डे, महेंद्र गांगर्डे अविनाश गांगर्डे सर
माजी मुख्याध्यापिका रजनीताई गांगर्डे यांनी विद्यालयात होत असलेल्या सर्वांगीण विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चांगदेव जायभाय, योगेश डमाळे, गंगाराम उंबरे, उमेश आखाडे, निखिल काशीद, संजय राठोड, भाग्यश्री गाडे, गणेश खंडागळे, भाऊसाहेब शिंदे, कैलास ढोबे, अनिस शेख, राजेंद्र खिल्लारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!