अंकलेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या इस्लामपूर शाखेचे भव्य उद्घाटन

दर्पण न्यूज इस्लामपूर : अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इस्लामपूर येथील सहाव्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनील चव्हाण (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली) व मा.श्री.उमाकांत कापसे (चार्टर्ड अकाउंटंट) व मा. श्री संभाजी पाटील (सह. निबंधक सहकारी संस्था इस्लामपूर वाळवा) व मा.डॉ. सतीश गोसावी (एमडी मेडिसिन) यांनी उपस्थित राहून संस्थेच्या अल्पावधीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक केले.
सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेश चौगुले यांनी सांगितले की, “अंकलखोप सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली ही संस्था आज लोकांच्या विश्वासामुळे वेगाने विस्तारत आहे. अल्पावधीतच संस्थेने ६५ कोटी ३० लाख ठेवींचा टप्पा गाठला असून सध्या संस्थेचे ३९५० सभासद आहेत. संस्थेचे वसूल भाग भांडवल २ कोटी ६५ लाख, निधी १ कोटी ३५ लाख, कर्जवाटप ४२ कोटी ०१ लाख आणि गुंतवणूक १६ कोटी ०३ लाखांवर पोहोचली आहे. एन.पी .ए 0% आणि एकूण व्यवसाय १०७ कोटी ३१ लाख तर निव्वळ नफा १ कोटी ५ लाख इतका झाला आहे.”आणि सतत १५ % डिव्हिडंट ची परंपरा कायम राखली आहे.
इस्लामपूर सारख्या सहकार नगरीत संस्थेला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, “लवकरच १०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करू. या प्रगतीमागे संचालक मंडळ, सभासद व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. आर्थिक साहाय्याबरोबरच शेतकऱ्यांना माफक दरात खते, ऊसाची रोपे, पशुखाद्य पुरवून संस्थेचा मूळ उद्देश शेतकरी व गरजूंचे हित साधणे हाच आहे.”
समारंभाला उपाध्यक्ष रघुनाथ गडदे, संचालिका शितल चौगुले, संचालक राजेंद्र कुंभार, विकास सूर्यवंशी, डॉ. उमेश चौगुले, अरुण सावंत, सचिन लांडगे, अप्पासो सकळे, सुभाष चौगुले, सुरेश जोशी, मंगल मिरजकर, ॲड. अभिजीत परमणे, श्री.पंडित पाटील,श्री. अधिक जाधव सौ. अरुणा सूर्यवंशी सौ. वनिता सूर्यवंशी तसेच इस्लामपूर व परिसरातील अनेक मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.