सांगली-मिरज सिव्हिल हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालयात तळ ठोकून बसलेले अधिकारी- कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करा ; अन्यथा आंदोलन छेडणार ; वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्टचा इशारा

दर्पण न्यूज मुंबई :
सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्षानुवर्ष तळ ठोकून राहिलेल्या अधिकाऱ्यांना शासन निर्णयानुसार इतर जिल्ह्यांमध्ये तात्काळ बदली करण्यासाठी,
मा. अतिरिक्त संचालक साॊ वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई तसेच मा. अधिष्ठाता साॊ, सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न आस्थापना यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्षात भेटून घेऊन रितसर लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न आस्थापनांमध्ये काही उच्चस्तरीय अधिकारी हे विद्यार्थी दशे पासून ते लेक्चरनंतर मानधन तत्वावर काम करत आता कायमस्वरूपी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते आणि त्यांच्या मर्जीतले कर्मचारी गेली १५ ते २० वर्षे एकाच ठिकाणी कायमस्वरूपी तळ ठोकून बसलेले आहेत. शासन नियमावलीनुसार कोणत्याही अधिकाऱ्याची एकाच कार्यालयातील सेवा मुदत जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेली असताना, या अधिकाऱ्यांनी नियमांची उघड उघड पायमल्ली केली आहे.
त्यामुळे, एकाच ठिकाणी दशकानुदशके तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचार, गटबाजी आणि गैरव्यवहारांचे साम्राज्य निर्माण झालेचे नाकारता येत नाही, यामुळे मनमानी कारभार पद्धतीमुळे रुग्णसेवा व प्रशासनातील निष्पक्षता धुळीस मिळाली असून सर्वसामान्य जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. शासन निर्णयांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून या अधिकाऱ्यांनी सांगली-मिरज परिसरात स्वतःची मक्तेदारी उभी केली आहे. यांच्या विरोधात,
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा यांच्या वतीने याबाबत उच्चस्तरीय तक्रार निवेदन मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच मुख्य सचिवांकडे तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त आणि संचालक यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.युनियनने ठाम मागण्या सादर केल्या आहेत
1. १५–२० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या उच्चस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी.
2. शासन नियमावलीनुसार ३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच जिल्ह्यात राहिलेल्या सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेरील इतर ठिकाणी बदली करावी.
3. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्टाचार व गैरव्यवहारांचा पर्दाफाश करावा.
जर शासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी शासनाची राहील. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी
प्रशांत वाघमारे
पश्चिम महाराष्ट्र महासचिव,संजय भूपाल कांबळे
जिल्हा संपर्कप्रमुखसंजय संपत कांबळे
जिल्हाध्यक्षजगदिश कांबळे
जिल्हा कार्याध्यक्षअनिल मोरे (सर)
जिल्हा महासचिवकिशोर आढाव
जिल्हा उपाध्यक्षरूपेश तामगावकर
जिल्हा सदस्यविशाल कांबळे
जिल्हा सदस्य
हे प्रामुख्याने उपस्थित होते.