बेडकिहाळ येथे शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

दर्पण न्यूज बेडकिहाळ :- कै बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी शिंगाडे कार्यालयांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णाभाऊ साठे कमिटी अध्यक्ष सागर हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे थोर मराठी साहित्यिक होते. फक्त दीड दिवसांची शाळा शिकुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे एकमेव साहित्यरत्न, साहित्यसम्राट, लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे हे आहेत. शिक्षण नसताना ही त्यांनी शेकडो कथा, कादंबरी, गीत लिहिले आहेत. त्यांचे आयुष्य म्हणजे प्रेरणचा महासागर आहे. असे ते म्हणाले.
त्यावेळी पंकज हेगडे, सुरज हेगडे, अविनाश ऐवाळे, समीर हेगडे, महेश हेगडे, कार्तिक जाधव, दादासो हेगडे, सुरज हेगडे, प्रेम हेगडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.