माजी मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांचा प्रभाग ११ मध्ये काँग्रेस उमेदवारांसाठी जोरदार प्रचार
प्रभाग ११ मध्ये काँग्रेस उमेदवार रमेश रामचंद्र सर्जे (अ), अर्चिनी नंदकुमार कोळेकर (ब),अंजली अजित जाधव (क), हर्षवर्धन प्रतिक पाटील (ड) : नागरिकांची उपस्थिती



दर्पण न्यूज मिरज/सांगली ;- सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ११ मध्ये काँग्रेस उमेदवार रमेश रामचंद्र सर्जे (अ), अर्चिनी नंदकुमार कोळेकर (ब),अंजली अजित जाधव (क), हर्षवर्धन प्रतिक पाटील (ड) यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून जोरदार प्रचार केला.
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्ध आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ११ मधील मतदारांचा विश्वास व पाठिंबा निश्चितपणे काँग्रेसच्या पाठीशी राहील, हा विश्वास वाटतो. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि सर्वसमावेशक विकासाची दिशा अनुसरून आमची वाटचाल सुरु आहे. या वाटचालीत नवे कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत यामुळे सर्वांचा उत्साह वाढतो आहे. या उत्साहात आपण 15 जानेवारीला मतदान करावे, असे आवाहनही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी ही लोकांशी संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी विलास सर्जे, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.



