आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील  नागरिकांसाठी वरदान ठरणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

दर्पण न्यूज मुंबई : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यानराज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताप्रधान सचिव नविन सोनाआरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायकविरेंद्र सिंहवित्त विभागाच्या सचिव ए. शैलाआरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडेठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेआरोग्य संचालकसहसंचालकजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा रुग्णालया अद्ययावत होत असून त्यामध्ये ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय२०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण ९०० खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे. त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरणयंत्रसामग्री बसविणे आदी कामे सुरू आहेत. साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या ९०० खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे १०७८ नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करतानाच अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यावर भर देण्यात यावा. मंत्रालयात या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव श्री. सोना यांना दिले. हे जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्ह्यासोबतच रायगडनवी मुंबईपालघर याभागातील नागरिकांसाठी वरदान ठरेलअसेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यानठाणे जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतानाच राज्यातील महापालिका रुग्णालयामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहिम हाती घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगगर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहीम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थितीत्यांना लागणारी औषधेसाहित्यसामग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्रीसचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!