सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा 68 वा वाचन कट्टा उत्साहात
उद्योजक गिरीश चितळे यांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने दर महिन्यात होणारा वाचन कट्टा एक ऑगस्ट 2025 रोजी मी वाचलेले क्रांतिकारकाचे किंवा स्वातंत्र्य सैनिकाचे चरित्रात्मक पुस्तक या विषयावरती संपन्न झाला. हा 68वा वाचन कट्टा होता. अध्यक्षस्थानी गिरीश चितळे होते .
प्रारंभी कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून ऑगस्ट महिन्याच्या पार्श्वभूमीवर या विषयाचे महत्त्व विस्ताराने विशद केले या वाचन कट्ट्याच्या प्रारंभी साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले या वाचन कट्ट्यावर जयंत केळकर जयदीप पाटील हनुमंत शिंदे पुरुषोत्तम जोशी उर्मिला डिसले प्रथमेश वावरे ह.रा.जोशी उत्तम कांबळे जी जी पाटील हणमंत डिसले डी .आर .कदम यांनी वाचलेल्या पुस्तकांचे प्रभावीपणे सादरीकरण केले यावेळी गोपाळ कृष्ण गोखले क्रांतिसिंह नाना पाटील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके महात्मा गांधीजी आनंदराव जयवंत नाईक यशवंतरावजी चव्हाण आदी स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक समाजसेवक यांची माहिती उपस्थित सभासदांनी सादर केली यावेळी गिरीश चितळे यांनी वाचनालयास सहवेदनेतून समृद्धीकडे काकासाहेब चितळे या पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या. तसेच गायत्री चितळे यांनी लिहिलेली बालकादंबरी ही वाचनालयास भेट दिली. याचवेळी वाचनालयाचे जेष्ठ संचालक भुपाल नाना मगदूम यांनी वाचनालयास पाच हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी त्यांच्या नातवाने मिळवलेल्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव म्हणून मगदूम सरांनी वाचनालयास दिली. व आपला आनंद व्यक्त केला कार्यवाह सुभाष कवडे यांनी सूत्रसंचलन करून सर्वांचे आभार मानले व वाचन कट्टा उपक्रम संपन्न झाला. या वाचन कट्ट्याचे संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखन सौ विद्या निकम यांनी केलेले होते.