महाराष्ट्रराजकीयसामाजिक
मिरज येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेत केली पूजा

दर्पण न्यूज मिरज /सांगली -: मिरज येथे सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गणरायाचे आशीर्वाद सदैव कदम कुटुंबियांवर राहो, ही बाप्पा चरणी प्रार्थना करतो. कदम कुटुंबियांच्या आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानले. यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, माजी मंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.