पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 25 रोजी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता आटपाडी येथे दि बाबासाहेब देशमुख को-ऑप. बँक लि आटपाडी या बँकेच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट. सकाळी 10 वाजता आटपाडी येथे प्रसाद देशपांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सकाळी 10.30 वाजता आटपाडी येथून दिघंचीकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता दिघंची हायस्कूल दिघंची ता. आटपाडी येथे आगमन व दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी, आटपाडी चे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता दिघंची येथून पुणे निवासस्थानाकडे प्रयाण.