पलूस येथे तिसावीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्टबॉल महिला अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव प्रथम,कोल्हापूर द्वितीय, सांगलीने तृतीय क्रमांक पटकावला
स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न ; महाराष्ट्रातील 25 जिल्हा संघाचा सहभाग

दर्पण न्यूज पलूस:- सांगली जिल्हा पलूस येथे झालेल्या तीसाव्या वरिष्ठ राज्यस्तरीय सॉफ्टबॉल महिला अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने प्रथम, कोल्हापूर जिल्ह्याने द्वितीय, तर सांगली जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला.
पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 25 जिल्हा संघाने सहभाग घेतला होता स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध व नेटक्या पद्धतीने पार पडल्या.
स्पर्धेच्या समारोपासाठी शरद लाड चेअरमन क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल उपस्थित होते .
अध्यक्ष प्रकाश पुदाले, सचिव महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन प्रदीप तळवेलकर, डॉ.आशा पाटील, संदेश कुलकर्णी, सचिव धोंडीराम शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर ,पोलीस निरीक्षक संदीप पाटील ,प्राचार्य डॉ.आर एस.साळुंखे, माजी नगरसेवक निलेश येसुगडे, व्हा.चेअरमन क्रांती सहकारी साखर कारखाना दिगंबर पाटील, उद्योजक अरुण ब्रम्हे, सांगली जिल्हा सचिव अभय बीराज, संतोष साळुंखे, प्रीतीश रमेश पाटील शिवछत्रपती पुरस्कार, गोकुळ तांदळे सहसचिव महाराष्ट्र राज्य, किशोर चौधरी शिवछत्रपती पुरस्कार, उपस्थित होते.
500 महिला खेळाडू स्पर्धेसाठी उपस्थित होते. स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पंच उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्या. स्पर्धा नियोजनामध्ये नितीन हिंगमिरे,श्रीकांत मदने, सोमनाथ गोंधळी,विनायक जाधव ,अभिलाष शिसाळ , नदीम संदे व खेळाडूंनी मोठ्या कष्टाने स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या.