भिलवडी येथे गणेश मूर्ती घरीच विसर्जित करून पुस्तक भेट मिळवा
भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचा उपक्रम

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. यानुसार श्रींची मूर्ती घरीच विसर्जन करा आणि एक सुंदर पुस्तक भेट मिळवा हा उपक्रम याही वर्षी राबविला जाणार आहे. उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत घरीच कृत्रिम हौदात गणेश मूर्ती भक्तीपूर्वक विसर्जित करावयाची आहे. एका विशेष समारंभात गणेश मूर्ती घरीच विसर्जन केलेल्या गणेश भक्तांना सुंदर पुस्तक भेट दिले जाणार आहे. याच वेळी पर्यावरण पूरक गणेशोत्सव काळाची गरज या विषयावर चर्चासत्रही होणार आहे. तसेच गेली 22 वर्षापासून सुरू असलेले कृष्णा घाटावरील निर्माल्य संकलन याही वर्षी केले जाणार आहे. भिलवडी आणि परिसरातील सर्व गणेश भक्तांनी निर्माल्य कृष्णा नदीत विसर्जित न करता ते कृत्रिम हवदात म्हणजेच निर्माल्य संकलन ट्रॉली मध्ये विसर्जन करावे गेले वीस वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे साजरा होतो आहे. गणेशमूर्ती घरीच विसर्जन करा या उपक्रमात भिलवडी आणि परिसरातील जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभागी व्हावे. असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केलेले आहे. यासाठी संस्कार केंद्र भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे नावे नोंदवावीत असे आवाहन श्रीयुत सुभाष कवडे यांनी केलेले आहे