महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक
थोडा दिलासा : कोयना विसर्ग 93500 वरून 82100

दर्पण न्यूज भिलवडी ;- कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी *आज दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १३ फुटांवरून ११ फुटापर्यंत खाली आणून ८०,००० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे कोयना विसर्ग 93500 वरून 82100 करण्यात आला आहे. भिलवडी आणि परिसरातील कमी होण्याची शक्यता आहे.
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण *८२,१०० क्युसेक* विसर्ग करण्यात आला आहे. मात्र भिलवडी आणि परिसरात होत असलेली पाण्याची वाढ लोकांना चिंतन करणारी आहे.