सांगली जिल्ह्यातील ओबीसी, अनुसूचित जातीच्या योजनांना विशेष निधी द्या : रिपाई लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे
समाज कल्याण आयुक्त मेघराज भाते यांना निवेदन

दर्पण न्यूज सांगली -;
सांगली जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनांना विशेष निधी देऊन घरकुल, संविधान भवन, युवा बचत गट व बेरोजगार युवकांचे उद्योगाना गतिमान करण्यासाठी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांच्याकडे निवेदणाद्वारे केली.
सांगली येथील कार्यालयात बैठकीत पलूस कडेगाव रिपाई विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे, खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे,भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संजय मस्के, युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश गवाळे आदी उपस्थित होते.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांची भेट घेऊन जिल्ह्यातील रमाई घरकुल योजना, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील गरीब विध्यार्थी, स्कॉलरशिप योजना याबाबत चर्चा करण्यात आली.
रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी जातपडताळणी बाबत च्या अडचणी सांगून विविध समस्यांचे पाढे वाचले. तसेच युवा बचत गटांच्या माध्यमातून उद्योग निर्मिती साठी योजना राबवण्याची विनंती केली, बेरोजगार युवकांना सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्रातील योजना अमलात याव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली.
रमाई घरकुल योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात यावी.
वयोश्री योजना लाभार्थ्यांची अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहेत त्या लाभार्थ्यांना लाभ तात्काळ सुरू करण्यात यावा.
जिल्हास्तरावर राबवण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावर राबविण्यात यावेत.
वस्तीग्रह व निवासी शाळा यांचा चांगला दर्जा वाढवण्यासाठी सांगली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांनी विशेष लक्ष देऊन कार्यवाही करावी.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी विविध प्रशिक्षण तालुका निहाय राबविण्यात यावेत. ज्या गावांमध्ये समाज मंदिर बांधण्यात आले नाहीत किंवा खूप जुने झाले आहेत त्या ठिकाणी समाज मंदिर बांधून त्या ठिकाणी अभ्यासिका व वाचनालय यासारखे उपक्रम राबविण्यात यावेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
मिनी ट्रॅक्टर योजना निपक्षपातीपणे राबवून गरजू व खऱ्या लाभार्थ्यांना सदरच्या योजनेचा लाभ देण्यात यावा. अशा विविध मागण्या निवेदणाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी युवा उद्योजक सिद्धार्थ कांबळे, सरचिटणीस प्रविण मोरे उपस्थित होते.