कागल येथे प्रशांत हेगडे यांच्या महाराष्ट्र शासनाच्या अनंत आपले सरकार सेवा केंद्राला जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची सदिच्छा भेट

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारुती डी कांबळे)-: भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अनंत आपले सरकार सेवा केंद्राची श्री. प्रशांत हेगडे यांना कागल या ठिकाणी मिळालेली असून सदर केंद्राचा शुभारंभ काल सोमवार दिनांक 21/03/2025 रोजी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे, कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते, जयवंत हळदिकर , सतीश कांबळे आदि अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या नवीन अनंत आपले सरकार केंद्रातून सर्व नागरीकांची शासकीय, निमशासकीय तसेच इतरही महत्त्वाची कामे खात्रीपूर्वक तसेच जलदगतीने केली जातील.
तरी आपण सर्वांनी केंद्र, कागल येथे भेट देऊन आपली सेवा करण्याची संधी त्यांना द्यावी.


