भिलवडी येथे माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित
स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन सभा ; माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे भिलवडी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्काराने माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना सन्मानित करण्यात आले.
स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सहकार मंत्री आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना संचालक राजू पाटील, प्रतिक संग्राम पाटील , पृथ्वीराज पाटील, भिलवडी गावच्या सरपंच मुल्ला, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.