महाराष्ट्रराजकीय

तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडी धाराशिव पक्ष संघटनेची शनिवारी आढावा बैठक

 

 

 दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे):-

वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर या ठिकाणी पक्षाने आयोजित केली आहे
संभाव्य नगरपंचायत,नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वपूर्ण असून या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर,जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड,मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल,युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे,फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वय प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले हे सर्व उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा कार्यकारिणी,महिला आघाडी,युवक आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन,माथाडी जनरल कामगार युनियन,फुले आंबेडकर विद्वत सभा या सर्व शाखांमधील शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष त्याचबरोबर आजी-माजी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष आर.एस.गायकवाड जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे तुळजापुर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!