भिलवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनी विविध सामाजिक कार्यक्रम
भिलवडी येथे १५ ऑगस्ट रोजी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप ; १७ ऑगस्ट रोजी अभिवादन सभा व स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार वितरण

दर्पण न्यूज भिलवडी -;
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे भिलवडी गावचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दिनांक 15 आॅगस्ट आणि रविवार दिनांक 17 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भिलवडी गावचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. संग्राम दादा पाटील प्रथम स्मृतिदिनी कार्यक्रम पुढीलप्रमाणे शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ सकाळी ९.०० वा. मोफत शैक्षणिक साहित्य वाटप * स्थळ : ग्रामपंचायत मैदान, भिलवडी.सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० रक्तदान शिबीर* स्थळ : हनुमान मंदिर, भिलवडी. तसेच रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५सकाळी ९.३० वा. वृक्षारोपण * स्थळ : यल्लम्मा मंदिर परिसर, भिलवडी.सकाळी ९.०० : प्रतिमा पूजन, सकाळी ९.३० ते ११.३० भजन,सकाळी ११.०० ते २.०० स्मृती भोजन,* स्थळ: निवासस्थान, पाटील गल्ली, भिलवडी, रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वा. : अभिवादन सभा व स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. श्री. राजू शेट्टी यांना प्रदान करणेत येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षमाजी आमदार श्री. मोहनराव (दादा) कदम चेअरमन डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. साखर कारखाना, वांगी , या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा. खासदार विशालदादा पाटील, मा.आ.डॉ. विश्वजीत कदमसोो, लोकसभा सदस्य, सांगलीमाजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, तसेच * विशेष उपस्थित म्हणून मा.श्री. प्रतिकदादा पाटील माजी केंद्रिय मंत्री, मा. महेंद्र (आप्पा) लाड उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था,मा.आ. अरूण (आण्णा) लाड विधान परिषद सदस्य, मा. विश्वास चितळे संचालक – चितळे उद्योग समूह,मा.आ. सत्यजीत (भाऊ) देशमुख विधान सभा सदस्य, शिराळा, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्मृतिदिन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिक संग्रामदादा पाटील आणि आयोजकांनी केले आहे.